आपल्याला ‘द्वेषा’ची नाही, तर ‘प्रेमा’ची गरज आहे आणि ‘लव्ह जिहाद’सारख्या फसव्या अभियानाची तर अजिबातच गरज नाही
आपली रोगट मानसिक विकृतीने पछाडलेल्या पुराणमतवादी ‘तालिबानी समाज’ बनण्याकडे वेगाने वाटचाल होत आहे. त्यामुळे समाजाचे होणारे नुकसान कधीही भरून निघणारे नाही. आपण केवळ अशी आशा व्यक्त करू शकतो की, पराकोटीच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या या काळात देशातील जनतेला हे लवकरच समजावे की, आपल्याला द्वेषाची नाही तर प्रेमाची गरज आहे आणि ‘लव्ह जिहाद’सारख्या फसव्या अभियानाची तर अजिबातच गरज नाही.......